दत्तक मुलीवर धर्मांतरासाठी दबाव

१७ वर्षीय मुलीवर मुस्लीम दात्याकडून लैंगिक अत्याचार
दत्तक मुलीवर धर्मांतरासाठी दबाव

भाईंदर : आई आणि वडील दगावलेल्या १७ वर्षीय दत्तक मुलीवर मानलेल्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मीरा रोड येथे उघडकीस आला आहे. धर्मपरिवर्तनासाठी देखील तिच्यावर दबाव टाकत जात होता, असे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी १७ वर्षांची असून, मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. कोरोनाकाळात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, तर आईने जानेवारीत आत्महत्या केली होती. त्यामुळे पीडित मुलगी व तिचे दोन भाऊ अनाथाश्रमात राहत होते. दरम्यान, मीरा रोड येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने या पीडित मुलीसह तिच्या दोन लहान भावांनाही दत्तक घेतले होते. त्यानंतर दत्तक घेणारे कुटुंब हे त्यांना ठरावीक अंतराने दर्गा येथे दर्शनासाठी नेत होते. तसेच धर्मांतर करण्यास सांगत होते. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑगस्टला त्या कुटुंबातील एका १९ वर्षीय तरुणाने (मुलीचा मानलेला मामा) पीडिता घरात झोपली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

याप्रकरणी पीडिता घर सोडून भाईंदरच्या जेसल पार्क भागात आली. शेवटी तिच्या तक्रारीवरून मीरा रोड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात कलम ३७६, ३७६ (२) (एन) २९८, ५०६, ३४ सह बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा (पोक्सो) कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in