पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीमध्ये झाली घट

वाहनधारक व सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सीएनजीच्या दरात वाढ होत होती
 पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीमध्ये झाली घट
Published on

महानगर गॅस लिमिटेडने पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीमध्ये घट केली आहे. सीएनजीची किंमत प्रति किलो सहा रुपयांनी, तर पीएनजीची किंमत प्रति किलो चार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारक व सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सीएनजीच्या दरात वाढ होत होती. आता दरकपात करण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ही दरवाढ मध्यरात्रीनंतर लागू होणार असून १७ ऑगस्टपासून नव्या दराने सीएनजी आणि पीएनजीची विक्री सुरू होईल. त्यामुळे आता सीएनजीसाठी सर्व करांसह सुधारित दर प्रति किलो ८० रुपये तर पीएनजीसाठी प्रति किलो ४८ रुपये ५० पैसे असा असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in