पंतप्रधान बुधवारी मुंबई दौऱ्यावर

महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. येत्या बुधवारी म्हणजेच १५ जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधानांच्या हस्ते ‘सुरत’ आणि ‘निलगिरी’ या युद्धनौकांचे तसेच ‘वाघशीर’ या स्कॉर्पियन बनावटीच्या पाणबुडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खारघरच्या सेक्टर-२३ येथील इस्कॉनच्या मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर महायुतीच्या सर्व आमदारांसोबत ते स्नेहभोजन करणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in