युवकांमधील कौशल्य विकासातून रोजगारवाढीला प्राधान्य; महाराष्‍ट्र स्‍टार्टअप यात्रेला सुरुवात

उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना या माध्यमातून १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत
युवकांमधील कौशल्य विकासातून रोजगारवाढीला प्राधान्य; महाराष्‍ट्र स्‍टार्टअप यात्रेला सुरुवात

“युवकांमधील कौशल्य विकासास प्राधान्य देणार असून, त्याद्वारेही रोजगार कसा वाढेल, हे आम्ही पाहणार आहोत. आज सुरू होत असलेली स्टार्टअप व नावीन्यता यात्रा राज्यातील कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला व्यापक गती देईल,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्‍त केला. राज्यातील तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना या माध्यमातून १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत. वर्षा निवासस्थानी मोबाइल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून मुख्यमंत्री शिंदे यांनी यात्रेचा शुभारंभ केला. याप्रसंगी राज्याचे कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

स्टार्टअप यात्रेद्वारे राज्यातील सहा विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता, नावीन्यता, युनिकॉर्न याविषयक मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी व जनजागृती केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in