पृथ्वीराज चव्हाण यांची उच्च न्यायालयात धाव; अतुल भोसले यांच्या आमदारकीला आव्हान

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या आमदारकीला आव्हान दिले
पृथ्वीराज चव्हाण यांची उच्च न्यायालयात धाव; अतुल भोसले यांच्या आमदारकीला आव्हान
Published on

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या आमदारकीला आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर २४ जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचा ४० हजार मतांना पराभव केला. या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि मतदानयंत्राबाबत याचिकेत प्रश्न उपस्थित केला आहे.

निवडणूक काळात विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकांकडून झालेल्या गैरव्यवहाराचे मुद्दे निवडणूक आयोगाकडे अनेकवेळा उपस्थित केले. तथापि, या मुद्द्यांची योग्य पडताळणी केली गेली नाही किंवा ते गांभीर्याने घेतले गेले नाहीत. परिणामी, निवडणूक प्रक्रिया मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात झाली नाही, असाही दावा चव्हाण यांनी याचिकेत केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in