

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, अन्य स्टाफ, नातेवाईक यांना मास्क वापरण्याची सूचना केल्या आहेत. तसेच १४६ रुग्णालये सज्ज असून एक हजार बेड्स तैनात करण्यात आल्याची माहिती खासगी रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिका रुग्णालयांत रुग्ण, नातेवाईक व स्टाफला मास्क सक्ती करण्यात आली आहे. याबाबत मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी आदेश जारी केले आहेत. पालिका रुग्णालयात मास्कसक्ती करण्यात आल्याने खासगी रुग्णालये अलर्ट झाली आहेत. खासगी रुग्णालयातील स्टाफ, नातेवाईक व रुग्ण यांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १४६ खाजगी रुग्णालये असून प्रत्येक रुग्णालयात एक दोन कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील अनेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्ण वाढ नसली तरी खबरदारी म्हणून खाजगी रुग्णालयात मास्क वापरण्याचे आवाहन केल्याचे डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.