सोन्याच्या तस्करीप्रकरणी खासगी शिक्षकाला अटक

सोन्याची तस्करीप्रकरणी नंतर त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती.
सोन्याच्या तस्करीप्रकरणी खासगी शिक्षकाला अटक

मुंबई : सोन्याच्या तस्करीप्रकरणी एका खाजगी शिक्षकाला हवाई गुप्तवर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सलाहुद्दीन अमीन असे या शिक्षकाचे नाव असून, त्याच्याकडून या अधिकाऱ्यांनी १ कोटी २१ लाख रुपयांचे २ किलो १९८ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी सलाहुद्दीन अमीन हा जेद्दाहहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. बीएसएम स्क्रिनिंगमध्ये त्याच्या बॅगेत सोने असल्याचे दिसून आले.

ग्रीन चॅनेलवरून तो विमानतळाहून बाहेर जात असताना त्याला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना २ किलो १९८ ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट आणि २२ कॅरेटचे सोने सापडले. त्याची किंमत १ कोटी २१ लाख रुपये इतकी आहे. सोन्याची तस्करीप्रकरणी नंतर त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in