प्राथमिक शिक्षकाची मुलगी बनली क्लास १ अधिकारी! दाभोणच्या प्रियंका म्हसकर यांची राज्यसेवा परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी

डहाणू तालुक्यातील दाभोण (म्हसकरपाडा) या छोट्याशा गावातील प्राथमिक शिक्षकांची मुलगी प्रियंका अनंता म्हसकर हिने आपल्या चिकाटी, मेहनत आणि निर्धाराच्या जोरावर मोठे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये आदिवासी महिला प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवून ती क्लास १ अधिकारी बनली आहे.
प्राथमिक शिक्षकाची मुलगी बनली क्लास १ अधिकारी! दाभोणच्या प्रियंका म्हसकर यांची राज्यसेवा परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी
प्राथमिक शिक्षकाची मुलगी बनली क्लास १ अधिकारी! दाभोणच्या प्रियंका म्हसकर यांची राज्यसेवा परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी
Published on

पालघर : डहाणू तालुक्यातील दाभोण (म्हसकरपाडा) या छोट्याशा गावातील प्राथमिक शिक्षकांची मुलगी प्रियंका अनंता म्हसकर हिने आपल्या चिकाटी, मेहनत आणि निर्धाराच्या जोरावर मोठे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये आदिवासी महिला प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवून ती क्लास १ अधिकारी बनली आहे.

वडील प्राथमिक शिक्षक आणि आई गृहिणी अशा साध्या कुटुंबातून आलेल्या प्रियंकाने संघर्षाला संधी बनवत, सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आपल्या बुद्धीची आणि जिद्दीची ताकद सिद्ध केली आहे.

शैक्षणिक प्रवासात तिने लहानपणापासूनच उज्ज्वल कामगिरी केली आहे. चौथी इयत्तेत शिष्यवृत्ती मेरिटमध्ये स्थान मिळवले, दहावीला ९३.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, बारावी (विज्ञान शाखा) मध्ये ७८.३१ टक्के गुण, ठाण्याच्या बी.एन. बांदोडकर कॉलेजमधून बारावी, तर मुंबईतील Government Law College, Churchgate येथून BLS LLB पदवी (८.८ CGPA) तसेच YCMOU मधून B.A. Political Science ही पदवी संपादन केली आहे.

एमपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात प्रियंकाने पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती. पुढे २०२३ मध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही तिने कामासोबत अभ्यास सुरू ठेवला. अखेर २०२४ मध्ये राज्यसेवा परीक्षेचे तीनही टप्पे पूर्व, मुख्य आणि मुलाखत यशस्वीरीत्या पार करून ती क्लास १ अधिकारी बनली.

त्यांचे वडील अनंता धर्मा म्हसकर हे केडीएमसीमध्ये प्राथमिक शिक्षक असून, आई अश्विनी अनंता म्हसकर गृहिणी आहेत. प्रियंका आपल्या या दोघांनाच आपल्या यशाचे खरे प्रेरणास्थान मानतात. त्यांच्या या विलक्षण यशामुळे केवळ दाभोणच नव्हे, तर संपूर्ण डहाणू तालुका आणि पालघर जिल्हा अभिमानाने उजळून निघाला आहे.

कोविड काळात गावात राहून Online Classes च्या माध्यमातून अभ्यास केला. ऑफलाइन क्लास लावला नाही, पण शिकायची इच्छाशक्ती प्रबळ होती. हे यश माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाचे आणि समाजाच्या साथ-सहकार्याचे फळ आहे.

प्रियंका अनंता म्हसकर

logo
marathi.freepressjournal.in