बेस्टच्या भंगार बस विक्रीची चौकशी; उच्चस्तरीय समितीची स्थापना; मंत्री उदय सामंत यांची माहिती

बेस्टच्या भंगार बस विक्रीप्रकरणी गैरव्यवहाराच्या आरोपांसंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : बेस्टच्या भंगार बस विक्रीप्रकरणी गैरव्यवहाराच्या आरोपांसंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य लहू कानडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.

बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या ओपन डबलडेकर बसेस असताना टी २० वर्ल्ड कप विजेत्यांच्या स्वागतासाठी गुजरातची बस का, बेस्ट बसेस भंगारात काढण्यात आल्याचा आरोप होत असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधान सभेत केली.

१९७१ ते २०१७ पर्यंत एकूण ९ हजर ६७७ बस भंगारात काढल्या होत्या , त्यातून १८२ कोटी प्राप्त झाले तर २०१७ ते २०२४ पर्यंत २ हजर ८३१ बस भंगारात काढल्या त्यापासून ८६ कोटींचे उत्पन्न मिळाले , यावर आक्षेप घेत सदस्य आशिष शेलार यांनी ही चुकीची माहिती असल्याचे सांगितले . १९७१ साली ई लिलाव पद्धतच नव्हती. ठरावीक भंगार विक्रेते हे कुर्ला परिसरातील असून त्यांनीच नावे बदलून निविदा मिळवल्या व ज्यांची इतकी वर्षे सत्ता होती. त्यांना हाताशी धरून बेस्टला लुटण्याचे काम केले. त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. बेस्टच्या भंगार बस आणि भंगार माल विक्रीबाबत ई लिलाव पद्धत अवलंबली जाते. तरीही, याबाबतचे आक्षेप लक्षात घेत याप्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य ॲड. आशिष शेलार, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, नितेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.

logo
marathi.freepressjournal.in