मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या ११ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन त्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या बढत्या प्रतिक्षेत होत्या. अखेर बढती मिळाल्याने या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नामदेव तुकाराम वाघमारे यांची निर्मलनगर येथून वाहतूक विभाग, जयश्री जितेंद्र जयभोये यांनी मालाड येथून जोगेश्वरी पोलीस ठाणे, दिलीप तुकाराम भोसले यांची वाहतूक विभागातून गोरेगाव पोलीस ठाणे, बालकृष्ण नारायण देशमख यांची आझाद मैदान पोलीस ठाणे येथून पायधफनी पोलीस ठाणे, राजेंद्र महादेव मच्छिंदर यांची एमआरए मार्ग येथून कफ परेड पोलीस ठाणे, अजय भगवान क्षीरसागर यांची बीकेसी पोलीस ठाण्यातनू मेघवाडी पोलीस ठाणे, शशिकांत दादू जगदाळे यांची बीकेसी येथून कुरार पोलीस ठाणे, संतोष नारायण धनवटे यांची व्ही. पी रोड येथून एमआरए मार्ग पोलीस ठाणे, संतोष अशोकराव घाटेकर यांची मुलुंड येथून पार्कसाईट पोलीस ठाणे, योगेश मारोती चव्हाण यांची ऍण्टॉप हिल येथून वडाळा टी टी पोलीस ठाणे आणि रघुनाथ हसु कदम यांची जुहू येथून बीकेसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन बदली करण्यात आली आहे.