मुंबई : मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांची बढती आणि बदलीचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या १८ सहाय्यक पोलीस आयुक्तांसह १० पोलीस निरीक्षक असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन बदली करण्यात आली आहे. १४ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ३३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या.
निनाद सावंत यांची वाहतूक, महेंद्र नेर्लेकर मुख्य नियंत्रण कक्ष, राजेंद्र मुळीक पुणे, संजय मोहिते यांची रायगड, दिपक चव्हाण सोलापूर ग्रामीण, सुधाकर शिरसाट मुंबई लोहमार्ग, शशांक शेळके डोंगरी विभाग, किशोरकुमार शिंदे गुन्हे शाखा, राजेश ओझा आर्थिक गुन्हे शाखा, सायरस इराणी वाहतूक विभाग, महेश तावडे वाहतूक विभाग, ज्ञानेश्वर वाघ गिरगाव विभाग, रेणुका बुवा चेंबूर विभाग, मोहम्मद युसूफ माजिद सौदागर विशेष शाखा एक, प्रिनम परब आर्थिक गुन्हे शाखा, संभाजी मुरकुटे कुर्ला विभाग, सुधीर हिर्डेकर गुन्हे शाखा, कलाम कौसर ऐनोद्दीन शेख संरक्षण व सुरक्षा विभाग विभागात बदली करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलातील अंतर्गत करण्यात आल्या बदल्यात मिलिंद जाधव यांची विशेष शाखा एक, मंदाकिनी नरोटे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, संताजी घोरपडे यांची विशेष शाखा एक, योगेश पाचे यांची सशस्त्र पोलीस नायगाव, श्रीमंत शिंदे यांची सशस्त्र पोलीस वरळी, मोहन माने यांची विशेष शाखा एक, सुधीर कुडाळकर यांची सशस्त्र पोलीस मरोळ, सुदर्शन होनवाडकर यांची विशेष शाखा एक, सतीश गायकवाड यांची खैरवाडी पोलीस ठाणे, संजय काटे यांची जे. जे मार्ग पोलीस ठाणे, राजीव चव्हाण यांची एमआयडीसी पोलीस ठाणे, जीवन खरात यांची गुन्हे शाखा, महेश निवतकर यांची गुन्हे शाखा, अजय क्षीरसागर यांची गोराई पोलीस ठाणे, उमेश मच्छींदर यांची अंधेरी पोलीस ठाणे, रविंद्र क्षीरसागर यांची व्ही. बी नगर पोलीस ठाणे, जयवंत सपकाळ यांची बीकेसी पोलीस ठाणे, अनिल ठाकरे यांची बांगुरनगर पोलीस ठाणे, सचिन कदम यांची भोईवाडा पोलीस ठाणे, जगदीश कुलकर्णी यांची व्ही. पी रोड पोलीस ठाणे, राजेंद्र पवार यांची माटुंगा पोलीस ठाणे, राजेश कासारे यांची माहीम पोलीस ठाणे, दिपक दळवी यांची आझाद मैदान पोलीस ठाणे, नितीन तडाखे यांची एल. टी. मार्ग पोलीस ठाणे, संभाजी जाधव यांची मेघवाडी पोलीस ठाणे, सचिन सखाराम गावडे यांची ताडदेव पोलीस ठाणे, महेश बळवंतराव कांजूरमार्ग पोलीस ठाणे, विश्वनाथ कोळेकर यांची गावदेवी पोलीस ठाणे, संदीप रणदिवे यांची आरएके मार्ग पोलीस ठाणे, मधु घोरपडे यांची मानखुर्द पोलीस ठाणे, बासितअली सत्तारअली सय्यद यांची देवनार, सूर्यकांत नाईकवाडी यांची विक्रोळी पोलीस ठाणे, संजीव धुमाळ यांची खार पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.
१४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
शनिवारी १४ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यात कल्पना गाडेकर व रेणुका बागडे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, सूर्यकांत बांगर यांची साकीनाका विभाग, शैलेंद्र धिवार यांची सायन विभाग आणि भरतकुमार सूर्यवंशी यांची सशस्त्र पोलीस नायगाव, शशिकांत माने यांची दादर विभाग, अधिकराव पोळ यांची वांद्रे विभाग, हेमंत सावंत यांची भोईवाडा विभाग, चंद्रकांत काटकर यांची ओशिवरा विभाग, नीता पाडवी यांची मालवणी विभाग, प्रशांत राजे व शैलेश पासलवार यांची अनुक्रमे गुन्हे शाखा, प्रकाश चौगुले यांची विशेष शाखा एक, विजयसिंग बागल यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे.