पर्यटनाला चालना, महिलांना रोजगार; वरळी कोळीवाड्यात ‘फूड कोर्ट’, आरोग्य केंद्र

कोळीवाड्यांचा विकास करण्यात येणार असून यासाठी शुक्रवारी केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोळीवाड्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.
पर्यटनाला चालना, महिलांना रोजगार; वरळी कोळीवाड्यात ‘फूड कोर्ट’, आरोग्य केंद्र

मुंबई : कोळीवाड्यांचा विकास करण्यात येणार असून वरळी कोळीवाड्यातील महिलांसाठी रोजगारासाठी 'फूड कोर्ट' उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच मासळी सुकविण्यासाठी सौरऊर्जा आधारित 'ड्रायर मशीन’ उपलब्ध करण्यात येणार आहे. तर पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘फूड ऑन व्हील’ वाहने पुरवण्यात येणार आहे. वरळीतील क्लिव्हलँड जेट्टीच्या ठिकाणी स्थानिक महिलांच्या रोजगाराकरिता ‘फूड कोर्ट’ विकसित करण्यात येईल, असे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

कोळीवाड्यांचा विकास करण्यात येणार असून यासाठी शुक्रवारी केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोळीवाड्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपआयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त (जी दक्षिण) संतोषकुमार धोंडे, संबंधित अधिकारी, स्थानिक नागरिक आणि मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. क्लिव्हलँड जेट्टीवर आवश्यक असणारे काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना केसरकर यांनी पतन अभियंता तसेच मत्स्योद्योग विभागाला दिल्या. तसेच ‘फूड कोर्ट’ विकसित करण्याच्या अनुषंगाने आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी पालिकेला दिले.

वरळी कोळीवाड्यातील महिलांसाठी रोजगार निर्मितीचे साधन म्हणून मासळी सुकवण्यासाठी अत्याधुनिक असे सौरऊर्जा आधारित ‘ड्रायर मशीन’ही पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे कमी वेळात मासळी सुकवण्याचा पर्याय उपलब्ध होईल. वरळी कोळीवाड्यातील मासळी मंडईचे काम हे महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल, असेही केसरकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in