मुंबईतील कचऱ्याची वेळेवर योग्य विल्हेवाट लावा! कांजूर घनकचरा प्रकल्पाचा पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

कांजूर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचरा क्षेपणभूमीला मंगळवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट देऊन पाहणी केली...
मुंबईतील कचऱ्याची वेळेवर योग्य विल्हेवाट लावा! कांजूर घनकचरा प्रकल्पाचा पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई : कांजूर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचरा क्षेपणभूमीला मंगळवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया तसेच त्यासंबंधित अन्य कामकाजांचा आयुक्त गगराणी यांनी आढावा घेतला. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त संजोग कबरे, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

कांजूर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये रोज सुमारे ४५०० दशलक्ष टन नागरी घनकचरा गोळा केला जातो. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने बायोरिॲक्टर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रक्रिया केली जाते. तसेच घनकचऱ्यातून खतनिर्मितीची प्रक्रियासुद्धा केली जाते. या प्रकल्पाची आयुक्त गगराणी यांनी पाहणी करून आवश्यक निर्देश दिले. या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होते की नाही याचीही माहिती घेऊन सूचना केल्या. आयुक्त गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्रकल्प परिसरात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in