मालमत्ता करवसुलीचे टेन्शन! ७० टक्के कर्मचारी अडकले निवडणुकीच्या कामात, १५ दिवसांत ३००० कोटींचे उद्दिष्ट गाठणार कसे?

मालमत्ता करवसुलीचे टेन्शन! ७० टक्के कर्मचारी अडकले निवडणुकीच्या कामात, १५ दिवसांत ३००० कोटींचे उद्दिष्ट गाठणार कसे?

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्यात पालिकेच्या कर संकलन व निर्धारण विभागातील ७० टक्के निरीक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपले आहे. त्यामुळे...
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्यात पालिकेच्या कर संकलन व निर्धारण विभागातील ७० टक्के निरीक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत तीन हजार कोटींची वसुलीचे उद्दीष्ट कसे गाठणार अशी चिंता पालिकेच्या कर संकलन व निर्धारण विभागाला सतावत आहे. दरम्यान, कर संकलन व निर्धारण विभागाचे २४ वॉर्डात २५० हून अधिक निरीक्षक आहेत. यापैकी ७० टक्के निरीक्षक निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे मनुष्यबळाअभावी वसुलीत काहीसी अडचण येत आहे.

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत यंदा मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. मार्च अखेरपर्यंत ४,५०० हजार कोटींचे लक्ष असताना १२ मार्च २०२४ पर्यंत फक्त १,१९४.६१ कोटी वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवसांत उर्वरित तीन हजार कोटींच्या वसुलीचे उद्दीष्ट गाठणार कसे, अशी चिंता कर संकलन निर्धारण विभागाला सतावत आहे.

जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. परंतु गेल्या चार वर्षांत पालिकेने मालमत्ता करात वाढ केलेली नाही. त्यात नवीन बिल पाठवण्यास राज्य सरकारचा होकार न मिळाल्याने नवीन बिल पाठवणे शक्य झाले नाही. परंतु राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर २६ फेब्रुवारीपासून बिल पाठवण्यास सुरुवात केल्याचे कर संकलन व निर्धारण विभागाचे सह आयुक्त सुनील धामणे यांनी सांगितले.

मालमत्ताधारकांत जनजागृती

मार्च अखेरपर्यंत ४,५०० कोटींचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष आहे. २६ फेब्रुवारीपासून बिल पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता रोज ६० ते ७० कोटी रुपये मालमत्ता करापोटी जमा होत आहे. तरी मालमत्ता धारकामंध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून रिक्षातून अनाउन्समेंट, पोस्टर्स बॅनर्स होडिॅग लावण्यात येत असल्याचे धामणे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in