सार्वजनिक उत्सव मंडळांवर ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणाच्या उल्लंघनाचे खटले

हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडे यांनी सांगितले. यावेळी सागर चौपदार, अभिषेक मुरकुटे आदी उपस्थित होते.
 सार्वजनिक उत्सव मंडळांवर ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणाच्या उल्लंघनाचे खटले

हिंदूंचे सण आले की, ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण व जलप्रदूषणाच्या नावाखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात येते. २०१५ ते २०२१ पर्यंत ९२ टक्के कारवाई फक्त गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांवर करण्यात येते, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. दरम्यान, ३६५ दिवसांतून पाच वेळा भोंगे वाजतात, याकडे एमपीसीबीच्या अधिकारी जाणुनबुजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे पर्यावरण सचिवांकडे केल्याचे हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडे यांनी सांगितले. यावेळी सागर चौपदार, अभिषेक मुरकुटे आदी उपस्थित होते.

हिंदूंचे सण उत्सव आले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आवाजी पातळीची नोंद करते; मात्र हिंदूंच्या सणातच ध्वनिप्रदूषण होते का, गणेशोत्सव आला की, राज्यातील २७ जिल्ह्यांत २९० ठिकाणी ध्वनिमापन यंत्राद्वारे ध्वनिप्रदूषण किती झाले याची नोंद घेतली जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in