पोयसर नदीशेजारी बांधणार संरक्षण भिंत ;झोपडीधारकांची पूरापासून होणार सुटका

पोयसर नदीचे पाणी ओव्हर-फ्लो झाल्यानंतर त्या भागात नदी आणि नाल्याचे पाणी झोपडीधारकांच्या घरात शिरते
पोयसर नदीशेजारी बांधणार संरक्षण भिंत ;झोपडीधारकांची पूरापासून होणार सुटका
Published on

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात कांदिवली येथील पोयसर नदीला पूर येत असल्याने येथील झोपडीधारकांना तात्पुरते स्थलांतरित करावे लागते. झोपड्यांत पाणी शिरत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पोयसर नदीलगत पालिकेने लवकरच ३५० मीटरची संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील नदीलगतच्या झोपडीधारकांची पुरापासून सुटका होणार आहे.

कांदिवली पूर्वकडील पोयसर नदीलगत हनुमान नगर, समर्थवाडी, सरस्वती चाळ, गंगानगर, जनतानगर, भाजीवाडी या ठिकाणी वास्तव्याला असलेले झोपडीधारक गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यातील पूरपरिस्थितीला सामोरे जात आहेत. पोयसर नदीचे पाणी ओव्हर-फ्लो झाल्यानंतर त्या भागात नदी आणि नाल्याचे पाणी झोपडीधारकांच्या घरात शिरते. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसाळा संपेपर्यंत येथील रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. पालिकेने येथील पोयसर नदीचे पात्र खोल करण्याची सुरुवात केली आहे. आता पोयसर नदीला ३५० मीटर संरक्षण भिंत बांधली जाणार आहे. ही भिंत स्टॉर्म वाटर ड्रेन (पर्जन्य जलवाहिनी) विभागाकडून लवकरच बांधण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती पालिका आर. दक्षिण विभागातील प्रशासनाने दिली.

logo
marathi.freepressjournal.in