पार्लेकरांचे आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन

अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व परिसरात अतिशय कमी पाणीपुरवठा होतो आहे
पार्लेकरांचे आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन

मुंबई : अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व परिसरात अतिशय कमी पाणीपुरवठा होतो आहे. याबाबत दाद मागण्यासाठी अंधेरी, पार्ल्यातील नागरिक भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांच्यासोबत बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्त डॉ . इक्बाल सिंह चहल यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत. विलेपार्ले-अंधेरी वॉर्ड ८४ येथील कोल डोंगरी, पोदार वाडी, जीवन विकास केंद्र परिसर, जंम्बो दर्शन परिसर, विजयनगर , छत्रपती संभाजी महाराज नगर या विभागात कित्येक महिने ५० टक्केच पाणी पुरवठा होतो आहे. अनेक सोसायट्या टँकरने आपली रोजची पाण्याची गरज भागवत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in