आंदोलकांनी लवचिक भूमिका घेतली पाहिजे -अजित पवार; आशासेविकांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत आशासेविकांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला.
आंदोलकांनी लवचिक भूमिका घेतली पाहिजे -अजित पवार; आशासेविकांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक

प्रतिनिधी/मुंबई : अलिकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात की ज्यात आम्ही म्हणतो तसेच झाले पाहिजे. हे असेच झाले पाहिजेचा हट्ट आंदोलकांकडून धरला जातो. मात्र असे करून कसे चालेल. आंदोलकांनी सरकारसोबत वाटाघाटी करताना दोन पावले पुढेमागे करण्याची लवचिक भूमिका ठेवली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनकर्त्यांना सुनावले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत आशासेविकांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. १२ हजार आशासेविका गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यासांठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. पण, आशासेविकांची सरकारला कदर नाही. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आशासेविका आंदोलन सुरू ठेवणार आहेत. या आशासेविकांना सरकारने न्याय दिला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

आशासेविकांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “आशा सेविका या आपल्याच भगिनी आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीची वेळ दिली, चर्चाही केली. दोन पावले सरकारने पुढे आले पाहिजे, दोन पावले आंदोलकांनी पुढे झाले पाहिजे. पण, अलीकडे काहीजण आम्ही म्हणतो तसेच झाले पाहिजे, असा आग्रह धरतात. पण, असे कसे होईल. सरकारला आर्थिक गोष्टी, इतर बाबी तपासाव्या लागतात.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in