पालिका रुग्णालयांत जलद गतीने सेवा पुरवा; अतिरिक्त आयुक्त बांगर यांचे आदेश

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत आल्यावर रुग्णांना ताटकळत राहावे लागू नये, त्यांना विनाविलंब, जलद गतीने सेवा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.
पालिका रुग्णालयांत जलद गतीने सेवा पुरवा; अतिरिक्त आयुक्त बांगर यांचे आदेश
Photo Credit: Prashant Narvekar
Published on

मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत आल्यावर रुग्णांना ताटकळत राहावे लागू नये, त्यांना विनाविलंब, जलद गतीने सेवा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

पावसाळ्यातील आरोग्य समस्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, मुले यांना रुग्णालयात विविध टप्प्यांत लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने अधिक सुव्यवस्थित नियोजन व त्यानुसार अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. रुग्णांना केस पेपर, ओपीडी, एक्स रे, सोनोग्राफी आणि औषध घेण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी कमी करण्याच्या अनुषंगाने विविध स्तरावर उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. रांगेचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने 'टोकन पद्धती' सारख्या उपाययोजनांची शक्यता पडताळून पहावी, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in