धक्कादायक! अवघ्या पाच दिवसाचा संसार अन् नवरदेवासोबत घडले असे काही की...

पुण्याच्या बारामतीमधील माळेगावमध्ये अशी दुर्दैवी घटना घडली की संपूर्ण गाव हादरले. लग्न झाल्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी नवरीचे कुंकू पुसले.
धक्कादायक! अवघ्या पाच दिवसाचा संसार अन् नवरदेवासोबत घडले असे काही की...

१९ नोव्हेंबरला पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये राहणाऱ्या सचिन येळे या तरुणाचे लग्न हर्षदा या मुलीसोबत झाले. पण अवघ्या पाचच दिवसात काळाने घात केला आणि कुटुंबामध्ये शोक पसरला. अजून मंडपही उतरला नव्हता आणि लग्नाच्या पाचव्या दिवशी सचिनला हृदय विकाराचा झटका आला. नातेवाईकांनी ताबडतोब बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. पण, डॉक्टरांनी नवरा मुलगा सचिन मृत पावल्याचे सांगितले. ही बातमी गावात पसरली आणि सर्वांची माने सुन्न झाली. अवघ्या ५ दिवसातच हर्षदाच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं.

सचिन हा माळेगाव कारखान्याचे निवृत्त कर्मचारी अनिल पांडुरंग येळे यांचा लहान मुलगा होता. त्यामुळे त्याचे लग्न हे धुमधडाक्यात करण्यात आले. त्यानंतर रविवारी, सोमवारी रीतीरिवाज तसेच विधीवत देवदर्शनासाठी नवदंपत्य नातेवाईकांसह घरी आले. बुधवारी पूजा वगैरे झाली आणि गुरुवारी पहाटे त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. यावेळी सचिनच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा, मित्रपरिवारचा आणि नवरी हर्षदाचा आक्रोश उपस्थिथांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी नवरी मुलगी हर्षदाचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in