Pune Fire : पुण्यातील आरटीओमध्ये भीषण आग; १० गाडयांची झाली राख

पुण्यातील (Pune Fire) विश्रांतवाडी परिसरातील फुलेनगर भागातील घटना; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
Pune Fire : पुण्यातील आरटीओमध्ये भीषण आग; १० गाडयांची झाली राख
Published on

आज पुण्यातील एका आरटीओमध्ये भीषण आग लागली. (Pune Fire) या आगीमध्ये जप्त केलेल्या १० गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळाली नसून याचा तपास सुरु आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात अशा आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुदैवाने आज मकर संक्रांतीची सुट्टी असल्याने कोणालाही इजा झालेली नाही.

पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये आरटीओ कार्यालयाच्या आवारात जप्त गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. यावेळी लागलेल्या आगीमध्ये ४ चारचाकी, ४ लक्झरी बस, १ डंपर आणि १ टेम्पो जाळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच, अग्निशामक दलाने पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळवले. रविवारी कार्यालय बंद होती. त्यामुळे आग लागली की लावली अशी शंका व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही आग लागण्याची घटना घडलाय आहेत.

logo
marathi.freepressjournal.in