Google : पुण्यातील गुगल ऑफिस उडवण्याची धमकी; काही तासांत पोलिसांनी केली धमकी देणाऱ्याला अटक

पुण्यातील गुगलचे (Google) ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन आल्याने कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली होती
Google : पुण्यातील गुगल ऑफिस उडवण्याची धमकी; काही तासांत पोलिसांनी केली धमकी देणाऱ्याला अटक

पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देऊ, असा धमकी देणारा एक फोन मुंबईच्या गुगलच्या कार्यालयात आला होता. या बातमीनंतर पुण्यात गुगलचे ऑफिस असलेल्या कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर रविवारी रात्री बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

अवघ्या काही तासांमध्येच हा फेक फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन करणारी ४५ वर्षीय व्यक्तीला हैद्राबादमधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने दारूच्या नशेत हा फोन केल्याची माहिती पोलिसांना दिली असल्याचे सांगितले आहे. त्याचा भाऊ पुण्यात राहतो आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याचाच राग मनात धरून त्याने भावाला त्रास व्हावा म्हणून दारूच्या नशेत गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in