पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेणे शक्य नाही ;केंद्रीय निवडूक आयेागाची हायकोर्टात भूमिका

मागील सुनावणीवेळी खंडपीठने केंद्रीय निवडणूक आयोगाला धारेवर धरत पोटनिवडणूक का घेतली नाही, असा सवाल उपस्थित करत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेणे शक्य नाही
;केंद्रीय निवडूक आयेागाची हायकोर्टात भूमिका

मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेणे आता शक्य नाही. अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबई हायकोर्टात मांडली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी तसेच निवडणुकीसंबंधी इतर कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यास असमर्थता दर्शवत केंद्रीय निवडणूक आयोगाने बचावात्मक भूमिका घेतली. मात्र खंडपीठाने निवडणूक आयोगाचे हे स्पष्टीकरण असमर्थनीय असल्याचे मत व्यक्त करत केवळ नाराजी व्यक्त केली.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची कृती बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करून निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका पुण्याच्या सुघोष जोशी यांनी यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी खंडपीठने केंद्रीय निवडणूक आयोगाला धारेवर धरत पोटनिवडणूक का घेतली नाही, असा सवाल उपस्थित करत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in