वानखेडे स्टेडियमवर होण्याऱ्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स समोरासमोर

वानखेडे स्टेडियमवर होण्याऱ्या पहिल्या सामन्यात  पंजाब किंग्ज आणि  राजस्थान रॉयल्स समोरासमोर

आयपीएल २०२२ च्या डबल हेडरमध्ये शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होण्याऱ्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे एकमेकांपुढे उभे ठाकणार आहेत. विजय पथावर परतण्यास राजस्थान उत्सुक आहे, तर पंजाब किंग्जला विजयाच्या आशा टिकवून ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे.

कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. याचे मुख्य श्रेय जोव बटलरला आहे. बटलरने यंदाच्या हंगामात सर्वाधिक ५८८ धावा केल्या आहेत. मयंक अगरवालच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्जला प्ले ऑफमधील आपले स्थान मिळविण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी विजयासाठी झगडावे लागणार आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविण्यासाठी राजस्थानचा संघ गुजरात टायटन्सला कडवी टक्कर देताना दिसत होता. परंतु नंतर मात्र हा संघ गडबडला. कोलकाता नाइट राइडर्स आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांना आता पंजाबविरुध्द विजय आवश्यक झाला आहे.

गुणतालिकेत सर्वोच्च स्थानावर असलेल्या गुजरातवर आठ विकेट्सने विजय मिळविल्यानंतर पंजाबच्या खेळाडूंचा उत्साह वाढला आहे. प्ले ऑफ फेरीत स्थान मिळवायचे, तर या संघाला आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

राजस्थानसाठी देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन यांना अधिक जबाबदारी उचलावी लागेल. या संघाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अनेक पर्याय आजमावले आहेत. जर शिमरोन हेटमायरला या क्रमांकावर पाठविले तर वरच्या फळीतील अन्य फलंदाजांमध्ये गोलंदाजी चोपून काढण्याची निश्चितच क्षमता आहे.

राजस्थनाला प्रथम फलंदाजी करताना मोठे आव्हान उभारावे लागेल. प्रथम फलंदाची कराताना मोठे लक्ष्य उभारण्यात अपयश आल्यानेच चारपैकी तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. राजस्थानची गोलंदाजी प्रभावी असली, तरी गेल्या दोन सामन्यांमध्ये त्यांचे गोलंदाज १५८ आणि १५२ या धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी ठरले. ही धावसंख्या खूपच कमी होती. कारण आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारे युजवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रभावी गोलंदाजी केली आहे. पंजाबच्या फलंदाजांसाठी राजस्थानच्या गोलंदाजीचा सामना करणे सोप असणार नाही.

पंजाबच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव आहे. शिखर धवन सर्वात यशस्वी ठरला आहे. लियाम लिविंगस्टोन आणि भानुका राजपक्षे यांनीही उपयुक्त फलंदाजी केली आहे. त्यांना हे सातत्य या सामन्यातही राखावे लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा, जॉनी बेयरस्टो, राहुल चहर, हरप्रीत बरार, शाहरुख खान, प्रभासिमरन सिंह, जितेश शर्मा, ईशान पोरेल, लियाम लिविंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषि धवन, प्रेरक मांकड, वैभव अरोरा, ऋतिक चटर्जी, बलतेज ढांडा, अंश पटेल, नाथन एलिस, अथर्व ताएदे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, रियान पराग, केसी करियप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅककॉय, अनुय सिंह, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गरवाल, जेम्स नीशम, नाथन कूल्टर-नाइल, रासी वॅन डेर डूसन, डेरिल मिचेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in