
मुंबई: बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगणने ओशिवरा परिसरात ५ व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. हा व्यवहार ४५.०९ कोटी रुपयांचा आहे.
ओशिवरा येथे वीर सिग्नचर या प्रकल्पात १३,२९८ चौरस फूट जागा अजयने विकत घेतली. या इमारतीतील १६ व १७ मजले विकत घेतले. १६ व्या मजल्यावर तीन, तर १७ व्या मजल्यावर दोन जागा विकत घेतल्या आहेत.
विशाल वीरेंदर देवगण या नावाने १९ एप्रिल रोजी हा करार नोंदणीकृत झाला आहे. यासाठी २.७० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. १६ व्या मजल्यावरील जागा १.८२ कोटी रुपये, तर १७ व्या मजल्यावरील व्यावसायिक जागा ८८.४४ कोटी रुपयांना विकत घेतल्या आहेत. या जागेत त्यांना १४ पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. हा प्रकल्प वीर सावरकर प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड साकारत आहे.
काही वर्षांपूर्वी अजय देवगणने जुहू परिसरात ४७४.४ चौरस मीटरचा बंगला ४७.५ कोटी रुपयांना खरेदी केला होता. जुहू येथील कपोले सहकारी गृहनिर्माण संस्थेचा हा भाग होता. या जागेत ६५०० चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी राज्य सरकारला २.३७ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले होते.