पुष्कर जोगच्या आई सुरेखा जोग कायद्याच्या कचाट्यात

पुष्कर जोगच्या आई सुरेखा जोग कायद्याच्या कचाट्यात

सध्या ‘अदृश्य’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असलेला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोगच्या आई सुरेखा जोग कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागातील अधिकारी किसन दतोबा भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग, तसेच गौतम शंकर शडगे, किशोर पवार, हेमंत सावळकर यांच्याविरोधात भादंवि ४२०, ४६४, ४६५, ४६६, ४६८, ४७०, ४७१, २०१ आणि १२० ब ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

‘जोग एज्युकेशन’च्या ११ शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून स्व-मान्यता (बनावट) प्रमाणपत्र तयार करून कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुरेखा जोग यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ११ बनावट शाळांकडून विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा सुरेखा यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in