दरोड्यासाठी आलेल्या चौकडीला घातक शस्त्रांसह अटक

पोलिसांनी कोयता, चाकू, लोखंडी पक्कड, मिरची पूड, दोरखंड, स्क्रू ड्रायव्हर आदी दरोड्याचे साहित्य जप्त केले आहेत
दरोड्यासाठी आलेल्या चौकडीला घातक शस्त्रांसह अटक

मुंबई : दरोड्यासाठी आलेल्या एका चौकडीला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. शब्बीर अनिस अहमद शाह, अंकित लक्ष्मण गज्जी ऊर्फ बच्चा, शामराज फुलचंद जयस्वाल आणि सनी प्रविण गोहिल अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांकडून पोलिसांनी कोयता, चाकू, लोखंडी पक्कड, मिरची पूड, दोरखंड, स्क्रू ड्रायव्हर आदी दरोड्याचे साहित्य जप्त केले आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकलने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव येथील बांगुरनगर, गणेशघाट परिसरात काही आरोपी दरोड्यासाठी येणार असल्याची माहिती बांगुरनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवत मंगळवारी रात्री एक वाजता संशयास्पद हालचालीवरून चौघांना शिताफीने अटक केली तर त्यांचा एक सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यांनी गोरेगाव परिसरातील काका ज्वेलर्स दुकानात दरोड्यासाठी आल्याची कबुली दिली.

logo
marathi.freepressjournal.in