रवींद्र वायकर यांची ‘ईडी’ चौकशीला दांडी

वायकर यांच्या वकिलांनी ‘ईडी’ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोग्याच्या कारणास्तव त्यांना चौकशीतून सवलत देण्याची मागणी केली.
रवींद्र वायकर यांची ‘ईडी’ चौकशीला दांडी

आशिष सिंह/मुंबई: जोगेश्वरी येथे लक्झरी हॉटेल उभारणीत झालेल्या काळ्या पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते (उबाठा) आमदार रवींद्र वायकर यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वायकर यांनी ‘ईडी’ चौकशीला दांडी मारली.

सूत्रांनी सांगितले की, वायकर यांच्या वकिलांनी ‘ईडी’ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोग्याच्या कारणास्तव त्यांना चौकशीतून सवलत देण्याची मागणी केली. आता ईडीकडून त्यांना चौकशीतून सवलत दिली जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. दुसऱ्या समन्सला ते हजर न राहल्याने त्यांना नवीन समन्स पाठवले जाईल. रवींद्र वायकर यांच्याशी संपर्क साधला असताना ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. ते नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनाला उपस्थित असल्याचे समजते. वायकर यांना १७ जानेवारी रोजी ‘ईडी’ने चौकशीला बोलावले होते. वैद्यकीय कारणास्तव त्यांनी एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. मात्र, त्यांनी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले नाही, असे ‘ईडी’च्या सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in