श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची तलवार आज मुंबईत येणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण सोहळा

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सोमवारी मुंबईत दाखल होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या ऐतिहासिक तलवारीचे जोरदार स्वागत होणार आहे. सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तलवारीचा लोकार्पण सोहळा पार पडेल.
श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची तलवार आज मुंबईत येणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण सोहळा
Published on

मुंबई : श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सोमवारी मुंबईत दाखल होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या ऐतिहासिक तलवारीचे जोरदार स्वागत होणार आहे. सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तलवारीचा लोकार्पण सोहळा पार पडेल.

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी लंडन येथे ही तलवार ताब्यात घेतली आहे. उद्या सोमवारी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.

विमानतळ प्राधिकरणाकडून मंत्री आशिष शेलार हे सकाळी १० वाजता ही ऐतिहासिक तलवार स्वीकारतील. त्यानंतर विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाइक रॅली काढून, चित्ररथावर विराजमान करून ही तलवार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नेण्यात येईल.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ‘सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उद्घाटन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले हे विशेष उपस्थित राहणार आहेत.

तलवारीचे प्रदर्शन

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या इंग्लंडमधून आणलेल्या तलवारीचे व बारा वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्ट दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथील कला दालनात भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांनसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in