राहुल गांधी यांना दिलासा कायम; राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी टीका

राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा कायम ठेवला.
राहुल गांधी यांना दिलासा कायम; राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी टीका
Published on

मुंबई : राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा कायम ठेवला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना पाचारण केले आहे. तसेच गिरगाव दंडाधिकारी न्यायालयातील खटल्यावरील स्थगिती कायम ठेवत याचिकेची सुनवणी २७ फेुब्रवारीपर्यंत तहकूब ठेवली.

राजस्थान येथील सभेत २०१८ मध्ये राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना राहुल गांधी यांनी ‘कमांडर इन थीफ’, ‘चौकीदार चोर है’ आदी टीका केली होती. या वक्तव्यामुळे मोदी यांच्यासह भाजप व अन्य सदस्यांचीही प्रतिम मलिन झाली आहे. त्यामुळे गांधीविरोधात भाजपचे सदस्य महेश श्रीमल यांनी दंडाधिकारी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. याची दखल घेत गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्याने आणि राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांचा तक्रारीत समावेश करण्यात आल्याने राहुल गांधींच्या नावे २८ ऑगस्ट २०१९ मध्ये समन्स जारी करून हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान राहुल गांधी यांच्या वतीने अ‍ॅड. सुदीप पासबोला यांनी हायकोर्टात धाव घेऊन ही तक्रार रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in