राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे. त्याची सुनावणी त्यांच्यासमोर सुरू आहे
राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

मुंबई : आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनाही शनिवारी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आता अपात्रतेबाबत ३० ऑक्टोबर रोजी नवीन वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रविवारी दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली दौऱ्यात ते ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. आपला दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे. त्याची सुनावणी त्यांच्यासमोर सुरू आहे. आता याचिका एकत्र देखील करण्यात आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सुनावणीत शिंदे गटाने पुरावे सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. तर ठाकरे गटाने त्याला विरोध केला आहे. तातडीने निर्णय घ्या, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्याही आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी नवीन वेळापत्रक सादर करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर हे दिल्लीला गेले आहेत.

आपला दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित असून आपण महाधिवक्त्यांची भेट घेणार आहोत. तसेच अपात्रतेची याचिका दाखल झाल्यानंतर आमदारांना नोटीस जाणे हा सर्वसाधारण प्रक्रियेचा भाग असतो असे ते राष्ट्रवादीच्या आमदारांच्या नोटीसबददल विचारले असता म्हणाले. आमदार अपात्रतेच्या निकालाचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे नेमका निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in