संजय राऊतांचे वादग्रस्त विधान; विधानसभा अध्यक्षांनी दिले 'हे' आदेश

खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाबद्दल केलेल्या विधानावर आज सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते
संजय राऊतांचे वादग्रस्त विधान;  विधानसभा अध्यक्षांनी दिले 'हे' आदेश

आज विधिमंडळाचा तिसरा दिवस गाजला तो खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे. "महाराष्ट्राचे विधिमंडळ म्हणजे चोरमंडळ. गुंडामंडळ आहे," असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. यावरून सत्ताधाऱ्यांनी चांगलीच टीका करत त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली. यावेळी विरोधकांनीही यावरून सत्ताधारी नेत्यांशी सहमती दर्शवली. पण, आमदार भरत गोगवाळेंनी केलेल्या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला.

संजय राऊतांविरोधात भाजप-शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या विधानावरुन प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने सभागृह तहकूब करण्यात आले. यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, "संजय राऊतांनी सभागृहाचा अपमान केला असून याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. यासंबधी हककभांगाचा निर्णय ८ मार्चला देण्यात येईल," अशी माहिती त्यांनी दिली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकरांनी संजय राऊतांवर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांना दिला. या मुद्द्यावरून आज ४ वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडीमार करत आहे. आज त्यांनी कोल्हापूरमध्ये प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर चोरमंडळ, गुंडामंडळ आहे, असे म्हणत शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर हल्ला केला होता.

logo
marathi.freepressjournal.in