राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने म्हाडामधील रहिवाशांना पुनर्विकासाची दिवाळी भेट

अंतिम शासन निर्णय निघाला असल्याने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हाडा रहिवाशांना आनंदाची दिवाळी भेट मिळाली आहे.
राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने म्हाडामधील 
रहिवाशांना पुनर्विकासाची दिवाळी भेट

मुंबई : मोडकळीस आलेल्या म्हाडा इमारतीचा पुनर्विकास अनेक वर्षापासून रखडला होता. अनेक वेळा शासन निर्णय निघाले; मात्र त्यात अनेक त्रुटी होत्या. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारला वेळोवेळी शासन निर्णया मधील त्रुटी सुधारण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे आता अंतिम शासन निर्णय निघाला असल्याने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हाडा रहिवाशांना आनंदाची दिवाळी भेट मिळाली आहे.

मुंबईमधील ३८८ म्हाडा इमारतीचा पुनर्विकास होण्यासाठी कोणतेच धोरण नव्हते. म्हाडा संघर्ष कृती समितीने वेळोवेळी सरकारदरबारी पाठपुरावा करत, आंदोलन करत या २७ हजार कुटुंबातील रहिवाशांना न्याय दिला आहे.

राहुल शेवाळे व सदा सरवणकर, कृती समितीचे अध्यक्ष अजित कदम, उपाध्यक्ष किरण राणे, सचिव विनिता राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वेळोवेळी बैठका घेत रहिवाशांच्या बाजूने निर्णय घेतला आहे. त्यामुळे राहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'उबाठा गटाचे आमदार अजय चौधरी या आनंदाचे श्रेय घेण्यासाठी जाहिरात करत आहेत; मात्र त्यांनी जाहिरात करण्यापेक्षा किती वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठका लावल्या त्याचा पुरावा सादर करावा, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याप्रकरणी का निर्णय झाला नाही? असा सवालही शेवाळे यांनी यावेळी केला.

logo
marathi.freepressjournal.in