रायगड, नवी मुंबई, देशाला ताकद देतील- देवेंद्र फडणवीस

१९७३ साली या सागरी मार्गाची संकल्पना निश्चित झाली. त्यानंतर चाळीस वर्ष काहीच झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.
रायगड, नवी मुंबई, देशाला ताकद देतील- देवेंद्र फडणवीस
Published on

प्रतिनिधी/मुंबई : आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. अटलसेतूचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आज तेच उदघाटन करीत आहेत. ही आमच्या कामाची गती आहे. रायगड आणि नवी मुंबई आता देशाला आणि महाराष्ट्राला ताकद देतील. देशातील ६५ टक्के डेटा बँक ही या परिसरात आहे. या भागात नवीन विमानतळ होत आहे. त्याचेही भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. यावर्षी तेही सुरु होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

१९७३ साली या सागरी मार्गाची संकल्पना निश्चित झाली. त्यानंतर चाळीस वर्ष काहीच झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. काम करण्याची पद्धत बदलली आणि विकास कामांना गती मिळाली. आम्हाला साऱ्या मान्यता तातडीने मिळाल्या आणि या अटलसेतूचे काम सुरू झाले. या कामादरम्यान काही लोकांनी फ्लेमिंगोचा प्रश्न निर्माण केला. पण, आम्ही पर्यावरणाचे नियम पाळले आणि आज फ्लेमिंगोंची संख्या सुद्धा वाढते आहे. राज्याच्या बजेटमधून हा प्रकल्प केला असता, तर विलंब झाला असता. आम्ही पंतप्रधानांना विनंती केली, त्यांनी जपानशी बोलून जायकाकडून कर्ज मिळवून दिले. त्यामुळे हा प्रकल्प अतिशय गतीने पूर्ण होऊ शकला. यातून लाखो नागरिकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे.’

logo
marathi.freepressjournal.in