प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

भारतीय रेल्वेने यूटीएस (UTS) ॲपमधून ट्रेन पास बुकिंगची सुविधा कायमस्वरुपी बंद केली आहे. ज्या प्रवाशांचा पास अद्याप संपलेला नाही ते अजूनही UTS ॲपमधून आपला पास तिकीट तपासणीसाला दाखवू शकतात, पण नवीन पास बूकिंगची सुविधा मात्र आता उपलब्ध नाही.
प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर
प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तरसंग्रहित छायाचित्र
Published on

भारतीय रेल्वेने 'यूटीएस' (UTS) ॲपमधून ट्रेन पास बुकिंगची सुविधा आता बंद केली आहे. प्रवाशांनी पास बुकिंगसाठी नव्या ‘रेलवन’ (RailOne) ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या प्रवाशांचा पास अद्याप संपलेला नाही ते अजूनही UTS ॲपमधून आपला पास तिकीट तपासणीसाला दाखवू शकतात, पण नवीन पास बूकिंगची सुविधा मात्र आता उपलब्ध नाही. पास बुकिंगची सुविधा कायमस्वरुपी हटवण्यात आली आहे. प्रवाशांनी पास काढण्यासाठी ‘रेलवन’ (RailOne) ॲपचा वापर करावा, अशी सूचना 'यूटीएस'वर दिली जात आहे. पास सुविधा बंद करण्यात आली असली तरी सामान्य तिकीट बुकिंगची सुविधा अद्यापही 'यूटीएस'वर उपलब्ध आहे.

UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा
UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा

RailOne द्वारे ३ टक्के सवलत

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. RailOne अ‍ॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकिटे खरेदी करताना कोणत्याही डिजिटल पेमेंट पद्धतीने पैसे भरल्यास प्रवाशांना ३ टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत १४ जानेवारी २०२६ ते १४ जुलै २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत लागू राहणार आहे. आतापर्यंत RailOne अ‍ॅपवरून अनारक्षित तिकिटे काढताना केवळ R-wallet द्वारे पेमेंट केल्यासच ३ टक्के कॅशबॅक मिळत होता. मात्र नव्या निर्णयामुळे UPI, डेबिट/क्रेडिट कार्डसह सर्व डिजिटल पेमेंट पर्यायांवर थेट सवलतीचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय ३० डिसेंबर रोजी रेल्वे मंत्रालयाने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) यांना पाठवलेल्या पत्राद्वारे कळवण्यात आला असून, आवश्यक सॉफ्टवेअर बदल तत्काळ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RailOne द्वारे कसा बूक करायचा पास?

RailOne अ‍ॅप Play Store आणि App Store वर उपलब्ध आहे. यामध्ये मासिक पास खरेदी, आरक्षित, अनारक्षित तिकीट, रिफंड मिळवणे, जेवण ऑर्डर करणे, ट्रेन शोधणे, पीएनआर क्रमांक तपासणे अशा अनेक सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत.

  • UTS अ‍ॅप उघडल्यावर तुम्हाला RailOne अ‍ॅप डाउनलोड करण्याचा मेसेज दिसेल.

  • त्या लिंकवर क्लिक करून RailOne अ‍ॅप डाउनलोड करा.

  • आवश्यक सर्व माहिती भरा (ओळखपत्र वगैरे).

  • अ‍ॅपमध्ये लॉगिन करून पास बुक करा.

  • याशिवाय, प्रवासी रेल्वे स्थानकावर PRS काउंटरवरूनही मासिक पास बूक करू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in