गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे फुल

 गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे फुल

मुंबईहून कोकणात जाणारे चाकरमानी वाट पाहत असतात ती गणेशोत्सवाची. यंदा ३१ ऑगस्ट, २०२२ रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस येणाऱ्या गणेशोत्सवासाठी चार महिने आधीच रेल्वे प्रशासनाने आरक्षण उपलब्ध करत चाकरमान्यांच्या आनंदात भर टाकली; मात्र आरक्षण उपलब्ध होताच अवघ्या काही दिवसांतच कोकण व त्यामार्गे जाणाऱ्या गाड्यांतील सर्व आसने आरक्षित झाली आहेत. प्रतीक्षा यादीही मोठी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षण सुविधा बंद केल्याची माहिती दिली आहे.

मागील दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या कमी होती. यंदा मात्र चाकरमान्यांनी जोरदार तयारी केली असून मागील दोन महिन्यांपासूनच रेल्वे आरक्षणाची लगबग चाकरमान्यांनी सुरू केली आहे; परंतु कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी आरक्षण जाहीर होताच केलेल्या बुकिंगमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांतील आरक्षण क्षमता संपली आहे. तर २६ ते ३० ऑगस्टदरम्यान अनेक गाड्यांच्या विविध श्रेणीतील सर्व आसने आरक्षित झाल्याचे रेल्वेच्या वेबसाईटवर पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाचा प्रयत्न करताच प्रतीक्षा यादी अधिक झाल्याने रेल्वेने आरक्षण देणेदेखील बंद केल्याने चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in