रविवारी मध्य, हार्बर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार २ ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक
File Photo
File Photo

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार २ ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  

मध्य रेल्वे 

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत वाजेपर्यंतपरिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. ठाणे स्थानकाच्या पुढील जलद लोकल मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच, निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचणार आहेत. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. तसेच, वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. 

हार्बर रेल्वे 

कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत  परिणाम :  पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in