मुंबई : उपनगरीय रेल्वेचे विलंब वेळापत्रक आणि वाढत्या गर्दीवर उपाययोजनेबाबत रेल्वे प्रशासनाक- डून कोणताही तोडगा न निघाल्याने येत्या २२ ऑगस्ट रोजी शांततापूर्ण आंदोलन करण्यावर रेल्वे प्रवासी संघटना ठाम राहिल्या आहेत.
रेल्वे प्रवासी संघटनांच्या मागण्यां- बाबत रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवासी संघटनांमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेली बैठक निष्पळ ठरली. बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने रेल्वे प्रवासी संघटनांसह रेल्वे प्रवाशी शुभ्रवस्त्र घालून लोकल प्रवास करत रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदविणार आहेत.
लोकल खोळंबा, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा - इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी बुधवारी प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते. त्यानुसार ही बैठक पार पडली. बैठकीत रेल्वे संघटनांनी, आपल्याला बजाविण्यात आलेली नोटीस मागे घेण्याबाबत विनंती केली. या नोटीस मागे घेण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले.
गेल्या दोन वर्षांत लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत काहीच विचार झाला नाही. लोकलसाठीच्या पायाभूत सेवा सुविधा मेल/एक्सप्रे ससाठी वापरण्यात येत असल्याने लोकल सेवेवर परिणाम होत असल्याचे प्रवासी संघटनांनी बैठकीत नमूद केले. यावेळी रेल्वे प्रवाशांनी केलेली दिवा ठाणे - लोकल, ठाणे कसारा, ठाणे कर्जत या लोकल गाड्यांची मागणी प्रशासनाने नाकारली. तर गुरवली आणि पारसिक या नवीन स्थानकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद रेल्वेने दिला.
राज्य सरकारकडूनही निधी वेळेत मिळायला हवा...
केंद्र सरकारकडून रेल्वे प्रकल्पांसाठी निधी मिळत असला तरी प्रत्यक्षात राज्य सरकारकडूनही निधी वेळेत मिळायला हवा, मात्र यात अडचणी येत असल्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी बैठकीत नमूद केल्याचे रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात आले.