लॅपटॉप बॅग, मोबाइल चोरी करणाऱ्याला जेरबंद करण्यात रेल्वे पोलीसांना यश

लॅपटॉप बॅग, मोबाइल चोरी करणाऱ्याला जेरबंद करण्यात रेल्वे पोलीसांना यश

मुनीश मोहम्मद (२७) असे या चोराचे नाव असून तो गोरेगाव येथे राहण्यास आहे.

उपनगरीय रेल्वेस्थानकांवर वाढत्या प्रवासीसंख्येमुळे चोऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याबाबत रेल्वे पोलीस प्रशासनाकडून सीसीटीव्ही, स्थानकांवर ये-जा करणाऱ्या संशयित प्रवाशांची तपासणी यासारख्या गोष्टींवर भर दिला आहे; मात्र अंधेरी स्थानकातील चोऱ्यांचे प्रमाण अद्याप कमी झाले नसल्याचे उघड झाले आहे. अशातच रेल्वे पोलिसांच्या एका टीमने मात्र अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असणाऱ्या चोराला पकडण्यासाठी सलग तीन दिवस अंधेरी स्थानकात गस्त घालत चोराला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

मुनीश मोहम्मद (२७) असे या चोराचे नाव असून तो गोरेगाव येथे राहण्यास आहे. मागील अनेक महिन्यांपासून तो बेरोजगार असून, याच काळात प्रवाशांना लुटण्यास त्याने सुरुवात केली. अनेक तक्रारी आल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) एका १५ जणांच्या पथकाने अंधेरी रेल्वे स्थानकात सापळा रचला. प्रवासी म्हणून वावरणाऱ्या या विशेष पथकात महिला-पुरुष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश होता. सापळ्यात सहभागी १५ जणांनी स्थानकातील विविध प्लॅटफॉर्मवर पसरत बारीक नजर ठेवत पहारा दिला. याशिवाय स्थानकात ये-जा करणाऱ्या एंट्री आणि एक्‍झिट पॉइंट्सच्या सीसीटीव्ही फुटेजवरही बारीक लक्ष ठेवण्यात आले. याच वेळी शनिवार, १६ जुलै रोजी आरोपी मोहम्मद कोणत्याही सामानाशिवाय अंधेरी स्थानकात प्रवेश करत असल्याचे आढळले; मात्र काहीच वेळात तो एका लॅपटॉप बॅगसह स्टेशन सोडताना दिसला. गर्दीमुळे तो निसटला. सलग दोन दिवस रात्री गस्त घातल्यानंतर सोमवार, १८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास १५ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पथक सर्व आठ प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in