बेकायदा फेरीवाल्यांना रेल्वे सुरक्षा दलाचा दणका; २४ हजार ३३४ जणांना अटक

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा व गैरसोय टाळण्यासाठी बेकायदा फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे
बेकायदा फेरीवाल्यांना रेल्वे सुरक्षा दलाचा दणका;
२४ हजार ३३४ जणांना अटक
PM

मुंबई : रेल्वे हद्दीत, लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल ट्रेनमध्ये बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यात भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४ हजार ३३९ जणांवर गुन्हे दाखल केले असून २४ हजार ३३४ जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ३.०५ कोटींचा दंड वसूल केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत केलेल्या कारवाईत मुंबई विभागात ९ हजार ३९३ जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा व गैरसोय टाळण्यासाठी बेकायदा फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या फेरीवालाविरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुद्ध अत्यंत यशस्वी मोहीम राबवली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४ हजार ३३९ प्रकरणे नोंदवली गेली असून २४ हजार ३३४ जणांना अटक केली आहे आणि रुपये ३.०५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

अशी झाली कारवाई

मुंबई विभाग

९३९४ जणांवर गुन्हा दाखल

९३९३ जणांना अटक

एकूण १.०२ कोटी रुपये दंड वसूल

भुसावळ विभाग

७२०६ गुन्हे दाखल

७२०५ लोकांना अटक

१.२९ कोटींचा दंड वसूल

नागपूर विभाग

३१८१ गुन्हे दाखल

३१७९ जणांना अटक

१ लाखांचा दंड वसूल

 पुणे विभाग

१९९० जणांवर गुन्हे दाखल

१९९१ लोकांना अटक

१३.८८ लाखांचा दंड वसूल

रु. दंड  वसूल केला आहे.

सोलापूर विभाग

२५६८ जणांवर गुन्हे दाखल

२५६६ लोकांना अटक

२५.८७ लाखांचा दंड वसूल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in