लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांना रेल्वेचा कठोर कारवाईचा इशारा

शिवडी स्थानकावर नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर मध्य रेल्वेने स्टंटबाजी करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांना रेल्वेचा कठोर कारवाईचा इशारा
प्रातिनिधिक फोटो
Published on

मुंबई : शिवडी स्थानकावर नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर मध्य रेल्वेने स्टंटबाजी करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. या घटनेतील स्टंटबाजवर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. स्टंटबाजांविरोधात तक्रार नोंदविण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

ट्विटरवरील एका व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा चालत्या ट्रेनमध्ये चढताना धोकादायक स्टंट करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन कारवाईसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार वडाळा रोड येथील रेल्वे संरक्षण दलाने व्हिडीओ फुटेजमध्ये दिसणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मध्य रेल्वेने स्टंटबाजांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in