घाटकोपरवासीयांना पावसाळी दिलासा; पालिका प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय

घाटकोपर येथील पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जुन्या पर्जन्य जलवाहिनी बदलत नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
घाटकोपरवासीयांना पावसाळी दिलासा; पालिका प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय

मुंबई : घाटकोपर येथील पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जुन्या पर्जन्य जलवाहिनी बदलत नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. घाटकोपर येथील ११ प्रभागातील पर्जन्य जलवाहिनी नव्याने टाकणे, बॉक्स ड्रेनेजचे काम, वाहिन्यांचे रुंदीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार असून, यासाठी ३६ कोटी ८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुंबईत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले आहे. परंतु पर्जन्य जलवाहिनी या ब्रिटिशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. मुंबई घाणमुक्त करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती त्या बदलण्याचे काम पालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून घाटकोपर येथील ११ प्रभागातील पर्जन्य जलवाहिनी नव्याने टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

या प्रभागातील पर्जन्य जलवाहिन्यांचे पुनर्बांधकाम!

घाटकोपर प्रभाग क्रमांक १२५,१२६,१२७,१३०, १३१ व १३२ मधील पर्जन्य जलवाहिनी बदलणे, पुनर्बांधकाम व पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ३० लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in