राज कुंद्रा यांना समन्स; ६० कोटींची फसवणूक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना ६०.४८ कोटींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. यापूर्वी राज कुंद्रा यांना १० सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी मुदतवाढ मागितल्यामुळे आता त्यांना समन्स बजावले आहे.
राज कुंद्रा यांना समन्स; ६० कोटींची फसवणूक
Published on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना ६०.४८ कोटींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. यापूर्वी राज कुंद्रा यांना १० सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी मुदतवाढ मागितल्यामुळे आता त्यांना समन्स बजावले आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे, जेणेकरून हे दोघेही देश सोडून जाऊ शकणार नाहीत.

आर्थिक गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या लेखापाललाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. याआधी प्राथमिक चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना तीनदा समन्स बजावले गेले होते. मात्र त्यांनी लंडनमध्ये असल्याचे कारण सांगून वकीलाला उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र, वकिलांनी दिलेली माहिती अपुरी असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आणि त्यामुळे जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in