शिल्पा शेट्टीपासून वेगळं होण्याबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा ; ट्विट करत म्हणाला...

राज कुंद्राच्या या पोस्टवर चाहतेवर्ग मोठ्या प्रमाणात कमेंट करीत आहेत
शिल्पा शेट्टीपासून वेगळं होण्याबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा ; ट्विट करत म्हणाला...

उद्योगपती राज कुंद्रा काही दिवसांनापासून खूपचं चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज कुंद्रानं त्याच्या बायोपिकची घोषणा केली होती. या चित्रपटाचा ट्रेलरच देखील लॉन्च झाला. या सोहळ्यात राजने आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढून थेट मीडियाशी संवाद साधला होता.

दरम्यान, उद्योगपती राज कुंद्रा आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे दोघे वेगळं होणार असल्याची चर्चा सर्वत्र होतं आहे. राज कुंद्रानं आपल्या ट्वीटर अकाउंटवर या संदर्भात सूचक एक ट्वीट केलं आहे.

राजनं आपल्या ट्वीटमध्ये असं लिहिलं आहे की, "आम्ही दोघे वेगळे झालो आहोत आणि आम्हाला या कठीण परिस्थितीत थोडा वेळ द्या, अशी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे." मात्र, अद्याप या ट्वीटबद्दल शिल्पा शेट्टीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राजनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या ट्वीटचे स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे.

राज कुंद्राच्या या पोस्टवर चाहतेवर्ग मोठ्या प्रमाणात कमेंट करीत आहेत. अनेकांनी राज कुंद्राला ट्रोल केलं आहे. एका युजरनं कमेंट करत असं लिहलं आहे की, विभक्त म्हणजे घटस्फोट का? असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी हा 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in