राज कुंद्रा यांची कनिष्ठ न्यायालयात धाव

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे
राज कुंद्रा यांची कनिष्ठ न्यायालयात धाव

पोर्नोग्राफी प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांतून दोष मुक्त करा, अशी विनंती करत व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. सायबर पोलिसांनी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या आणखी एका प्रकरणात राज कुंद्रासह शार्लिन चोप्रा, पुनम पांडे, सुवांजित चौधरी, व्यावसायिक उमेश कामत, सॅम अहमद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर कुंद्राला अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in