हिंदी भाषिकांना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करा; हायकोर्टात याचिका दाखल

हिंदी भाषिकांना लक्ष्य करून कथित द्वेषपूर्ण भाषणात चिथावणी देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्या, तसेच मनसेची मान्यता रद्द करण्याचे निवडणूक आयोगाला आदेश द्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र Photo : ANI
Published on

मुंबई : हिंदी भाषिकांना लक्ष्य करून कथित द्वेषपूर्ण भाषणात चिथावणी देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्या, तसेच मनसेची मान्यता रद्द करण्याचे निवडणूक आयोगाला आदेश द्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून गेली काही वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आक्रमक असून अमराठी भाषिकांना लक्ष करीत आहेत. महाराष्ट्रातील उत्तर भारतीय-हिंदी भाषिकांविरुद्ध तसेच वैयक्तिकरित्या शुक्ला यांच्या विरोधात कथित द्वेषपूर्ण भाषणात चिथावणी देत असल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत धमक्या आणि हिंसाचाराच्या घडत आहेत, असा आरोप शुक्ला यांनी याचिकेत केला आहे. यापूर्वी शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावेळी सर्व्वोच्च न्यायालयाने शुक्ला यांची कानउघाडणी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in