राज ठाकरेंची आज मीरा-भाईंदरमध्ये सभा

मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मनसेच्या मोर्चाला विरोध झाल्याने संतापाची लाट उसळली होती. या सर्व घडामोडीनंतर आता राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये सभा होणार आहे.
राज ठाकरेंची आज मीरा-भाईंदरमध्ये सभा
Published on

मुंबई : मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मनसेच्या मोर्चाला विरोध झाल्याने संतापाची लाट उसळली होती. या सर्व घडामोडीनंतर आता राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये सभा होणार आहे. “ज्या मीरा-भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही, अशी मुजोरी दाखवणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी दणका दाखवला, जिथे मराठीचा मोर्चा नाकारून घोडचूक करणाऱ्या सरकारला मराठीजनांनी विराट मोर्चा काढून मराठी एकजुटीची शक्ती दाखवली. त्या मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा या देशातील सगळ्यात बुलंद आवाज आज घुमणार आहे. त्यामुळे सर्वांनी नक्की या,” अशी पोस्ट मनसेने समाजमाध्यमांवर टाकली आहे.

logo
marathi.freepressjournal.in