सयुंक्त महाराष्ट्र लढ्यातील शिलेदार, समाजसुधारक आणि पत्रकार केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष आणि त्यांचे नातू राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांना अभिवादन करणारी एक पोस्ट केली. प्रबोधनकार ठाकरे यांची वैशिष्ट्ये आणि ठाकरी बाणा याबद्दल अनेक गोष्टी सांगणारी ही पोस्ट आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आज आमच्या आजोबांची - प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी आजोबांनी रुजवलेला हा ठाकरी बाणा कायम कटाक्षाने अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की." असा विश्वास व्यक्त करत आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.