राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रात जोरदार धुरळा

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रात जोरदार धुरळा

महाविकास आघाडी सरकाराची राज ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे रविवारी झालेल्या सभेतील भाषणावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रात जोरदार धुरळा उडत आहे. महाविकास आघाडी सरकारातील तिन्ही घटक पक्षांनी राज यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे, तर प्रक्षोभक भाषणाबाबत राज यांच्यावर पोलीस कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी केली आहे.

‘‘राज यांची वक्तव्ये महाराष्ट्र जळायच्या उद्देशाने आहेत,’’ असा आरोप गृहनिर्माणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. ‘‘दुसऱ्यांना जातीयवादी म्हणताना, तुमच्या घराशेजारच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करायला कधीतरी गेलात का?’’ असा सवाल आव्हाड यांनी राज ठाकरे यांना केला. ‘‘शिवाजी महाराज यांची मुद्रा कुणालाही वापरता येत नाही. तरी मनसेने छत्रपतींची राजमुद्रा स्वत:च्या झेंड्यावर कशी काय घेतली,’’ असा आक्षेपही आव्हाड यांनी घेतला आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली. ‘‘शरद पवार यांच्या पायाखालच्या वाळूइतकी राज ठाकरे यांची लायकी नाही. पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवर भोंगे लावण्यासाठी परवानगी दिली आहे, मग विरोध करणारे हे आहेत तरी कोण,’’ असा सवाल आझमी यांनी उपिस्थत केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटले. ‘‘राज यांचे औरंगाबादचे कालचे भाषण त्याच पद्धतीच होते. जनतेच्या प्रश्नावर बोलतील, ही अपेक्षा त्यांनी फोल ठरवली. महाराष्ट्रात भोंग्यांबाबत सर्वत्र कारवाई झालेली आहे. म्हणून राज ठाकरेंच्या ४ तारखेच्या इशाऱ्याला अर्थ नाही. राज्याची करमणूक मात्र होत आहे,’’ असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in