राजेश कुमार यांना मुख्य सचिवपदी मुदतवाढ

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे आणखी तीन महिने सचिव पदाची जबाबदारी असणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त होणार होते.
राजेश कुमार यांना मुख्य सचिवपदी मुदतवाढ
Published on

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे आणखी तीन महिने सचिव पदाची जबाबदारी असणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त होणार होते.

१९८८ बॅचचे आयएएस अधिकारी राजेश कुमार मीणा यांनी ३० जून रोजी सुजाता सौनिक यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. ३१ ऑगस्ट रोजी राजेश कुमार सेवानिवृत्त होणार होते. मात्र, आता त्यांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे त्यांच्या मुदतवाढीची शिफारस केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्या मुदतवाढीला मंजुरी दिली आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाचे अवर सचिव भूपिंदर पाल सिंग यांनी महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना (सामान्य प्रशासन विभाग) लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारच्या २८ ऑगस्ट २०२५ च्या प्रस्तावाच्या आधारे, केंद्र सरकारने १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या सेवेत वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिवपदावर कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in